नाशिक | दि. ६ जानेवारी २०२६ नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेले मतदार जनजागृती अभियान प्रभावी ठरत असून, यामुळे शहरातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी व्यक्त केला. नाशिक महानगरपालिका व नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे भव्य मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, पत्