राहुरी: शहरातील बस स्थानकाचे काम धीम्या गतीने, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी प्रशासनाबाबत केली नाराजी व्यक्त
राहुरी शहरातील बस स्थानकाचे बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी आज गुरुवारी दुपारी बांधकामाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय त्वरित दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी तनपुरे यांनी यावेळी केली.