खुलताबाद: बंजारा समाजाला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी खुलताबादेत भव्य मोर्चा
बंजारा समाजाला हैदराबाद इस्टेट गॅजेट १९२० नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती तर्फे येत्या दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सकल बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यास परवानगी तसेच योग्य ती सुरक्षा व्यवस्था मिळावी, यासाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षक खुलताबाद यांना गुरुवारी (ता.२५) लेखी निवेदन देण्यात आले