नेर शहरात नबाबपूर, अशोक नगर, जुने बस स्थानक परिसरामध्ये मोकाट जनावरांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोकाट जनावरांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात.त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.