नेवासा: घरफोडी प्रकरणातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला
नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने अटक केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या चोरीत घरातून सुमारे ३ लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली गेली होती.