बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत १ डिसेंबर रोजी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली. नायगाव दत्तापूरहून जाणाऱ्या बारा टायर ट्रक (क्र. MP 51 ZA 8816) मध्ये २७ म्हशी बेकायदेशीर व अमानुष पद्धतीने कोंबून बांधलेल्या अवस्थेत आढळल्या.तपास सुरू असून चोरीचे रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस पथक सतर्क आहे, असेही ठाणेदार मोरे यांनी सांगितले.