पाथर्डी: पाथर्डीच्या तिसगावात विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू... महावितरण विरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको...!
पाथर्डी तालुक्यातील तीसगावमध्ये विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यु झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलं. सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीसगाव येथे अनेक मोठ्ठमोठ्ठे झाडे पडली. यामध्ये सलाबत खान मशिद जवळील एका वाड्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर झाडाची फांदी पडली. फांदी तुटल्याने घरामध्ये घेतलेल्या वीज कनेक्शनची सर्व्हिस वायर देखील या फांदीमुळे तुटली गेली. मंगळवारी गाडीवर पडलेली फांदी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या शैनाज उर्फ बुरी खाला स