नागपूर ग्रामीण: 100 गुन्ह्यातील लाखो रुपयांचा जप्त मुद्देमाल बुटीबोरी एमआयडीसी येथे करण्यात आला नष्ट
पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर नागपूर शहरात राबविण्यात आले या अंतर्गत धडक कार्यवाही करत तब्बल १०० गुन्ह्यात 272 किलो 242 ग्राम अमली पदार्थ जसे की गांजा एमडी चरस गर्द पावडर जप्त करण्यात आले. या मालाची किंमत एकूण 42 लाख 77 हजार 582 रुपये सांगण्यात आले आहे. हा माल आज महाराष्ट्र ईन्व्हायरो लिमिटेड एमआयडीसी एरिया बुटीबोरी येथे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आल.