चाळीसगाव: मल्हार गडावरील हनुमान मंदिराचे लोकार्पण; ‘देव, देश, धर्मासाठी सदैव कटिबद्ध’ - आ. मंगेश चव्हाण
चाळीसगाव: मुमताजसाठी शहाजहानने बांधलेल्या ताजमहालापेक्षाही, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी मल्हार गडावर उभारलेले हनुमान मंदिर हे त्यांच्या घामाचे प्रतीक आणि संस्कृती टिकवण्याचे मोठे कार्य आहे. देव, देश आणि धर्मावर संकट आल्यास षंढ राहून चालणार नाही, मी या तिन्ही गोष्टींसाठी सदैव कटिबद्ध राहीन आणि खानदेशातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात प्रतिष्ठानच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.