नेवासा: मुलांनी बनविला प्रतापगडाचा आकर्षण किल्ला
नेवासा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये गडकिल्ल्यांची ओळख व्हावी यासाठी किल्ला तयार करून शिवरायांच्या काळातील स्मृतींना उजाळा मिळत आहे. याचे प्रत्यय प्रतापगड किल्ला या आकर्षक उपक्रमातून सर्वांना आला. यावेळी युवा नेते संजय सुखधान यांच्या हस्ते फित कापून किल्ला बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून कौतुक करण्यात आले.