रामटेक: चाचेर येथे शेतात काम करीत असताना 45 वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
Ramtek, Nagpur | Oct 16, 2025 गुरुवार दि. 16 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान चाचेर येथील आपल्या शेतात शेतकाम करीत असताना सर्पदंशाने एका 45 वर्षे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव शंकर भाऊराव टिकले वय 45 वर्षे रा. चाचेर असे आहे. शेतात काम करीत असताना त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचे लक्षात आले. परंतु त्याने याकडे फारसे लक्ष दिले नाही व काम आटोपल्यावर तो घरी परत आला. या दरम्यान अचानक गुंगी येऊन भोवळ आल्याने तो खाली पडला. त्याला सर्प दंश झाल्याचे लक्षात आले.