धुळे: वडजाई धरणात बुडून ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Dhule, Dhule | Sep 22, 2025 धुळ्यात वडजाई गावाजवळ मेहुणे आणि बहिणीसोबत आनंदाचे क्षण घालवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. धुळे तालुक्यातील वडजाई धरणात बुडून ३४ वर्षीय निसार अहमद मोहम्मद शरीफ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निसार हे धुळ्यातील मौलवीगंज परिसरातील रहिवासी होते.