वत्सगुल्म कराओके क्लबच्या वतीने दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. गीत गायन स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट असे गीत गायन केले. सदर कार्यक्रमास परीक्षक म्हणून एसएम जोशी व प्राध्यापक डॉक्टर संजीव इंगळे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद पाटील, प्राध्यापक सुभाष पवार, सुशील भीमजियाणी, हिरासिंग राठोड, डॉ. दीपक दामोदर, मोहन वाघमारे, विश्वास ब्रह्मेकर, दीपक साठे, करण पवार यांनी परिश्रम घेतले.