रामटेक: देवलापार येथे शिवसेना पक्ष मेळावा व कार्यकर्ता संवाद कार्यक्रम संपन्न
Ramtek, Nagpur | Oct 5, 2025 शिवसेना पक्ष मेळावा व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांनी उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. अनेक आदिवासी बांधवांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने आनंद व्यक्त करत, एकजुटीने व निष्ठेने पक्ष दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे सांगितले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शिवसैनिकाने जनतेत राहून ताकदीने काम करावे, असे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे रामटेकमध्ये भगवा फडकवता आला.