गावातील महत्त्वाच्या दोन तातडीच्या मागण्यांबाबत आज निवेदन सादर करण्यात आले. महामंत्री कृपाल सातपुते यांनी जोगा रोडची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी संबंधित विभागास निवेदन दिले. तसेच वार्ड क्र. 2 मध्ये 11 KV वीज लाईन घरांच्या अगदी वरून जात असल्यामुळे तातडीने ती स्थलांतरित करण्यासाठी माननीय आमदार आशिषभाऊ देशमुख यांना विशेष निवेदन देण्यात आले.दरम्यान, नांदागोमुख गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामांच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला.