हेमंत उत्तमराव डहाके यांनी प्रमोद उर्फ बादल मानकर राहणार नवसारी अमरावती यांच्या विरोधात कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे. हेमंत हे पोलीस अमलदार पदावर कार्यरत असून अमरावती जात असताना मार्डी येथे पोलीस पाटील यांच्याशी बोलत असताना मोटर सायकल स्वार दारू पिऊन हेमंत यांच्या जवळून जाताना जोरजोरा ओरडत होते. हेमंत ने हटकले तर प्रमोद उर्फ बादल ने शिवीगाळ केली व बुक्क्यांनी तोंडावर तसेच हातातील कळ्याने तोंडावर मारहाण केली. तुला पाहून घेण अशी धमकी दिली. अशी तक्रार हेमंत मी पोलिसात दिली आहे.