रावेर: अकलूद येथील आसाराम बापू आश्रमच्या मागे राहणारी तरुणी बेपत्ता,फैजपूर पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Raver, Jalgaon | Nov 17, 2025 अकलूद या गावात आसाराम बापू यांचे आश्रम आहे. या आश्रमच्या मागील बाजूस हेमलता उर्फ गुडिया विजय सारवान वय २६ ही तरुणी आपल्या कुटुंबासह होती दरम्यान ती आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे