जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील एका सराईत चोरट्याला शुक्रवारी 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या ३ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे जळगाव शहर आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यातील चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.