कन्नड: तीन दिवसांपासून वाहून गेलेल्याचा शोध; माजी आमदाराची थेट नदीत उडी, धाडसी प्रयत्नांचा व्हिडिओ व्हायरल
कन्नड तालुक्यातील तीन दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे गराडा येथे ५५ वर्षीय व्यक्ती पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली. माजी आमदार उदयसिंह राजपुत यांनी धाडस दाखवत स्वतः पाण्यात उडी घेऊन शोधमोहीम हाती घेतली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, कन्नड तालुक्यातील पिशोर येथे १० वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी एसडीओ संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, एसडीपीओ व सपोनी शिवाजी नागवे घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ पथकाचाही शोधमोहीमेत सहभाग आहे.