आज दिनांक 21 डिसेंबरला जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यात सर्वच पक्षाला संमिश्र यश मिळाले. परंतु सर्वत्र चर्चा होत आहे ती नेर नगरपरिषद येथील विजय प्राप्त केलेल्या एका अपक्ष उमेदवाराची.ज्यांचे नाव आहे जांभा उर्फ सचिन कैलासराव कराळे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील सचिन कराळे यांना नागरिकांनी मदत करून उभेही केले आणि त्यांना निवडून ही आणले. नागरिकांनी ठरविले तर ते काही करू शकतात याचा प्रत्यय या निवडणुकीतून आला.