भंडारा: नगरपरिषद मतमोजणी स्थगिती: 'लोकशाहीच्या विरोधातला निर्णय' - आमदार डॉ. परिणय फुके
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपरिषद निवडणुकीतील मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि चुकीचा असल्याची तीव्र प्रतिक्रिया आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. "जिथे काही चुका झाल्या होत्या किंवा केसेस प्रलंबित होत्या, तेथील स्थगिती समजू शकते; मात्र सरसकट सर्वच निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत स्थगित करणे हे लोकशाहीच्या विरोधातले पाऊल आहे," असे मत त्यांनी नोंदवले.