यवतमाळ: शहरातील दारव्हा रोडवरील लाठीवाला पेट्रोल पंपजवळ चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
यवतमाळ शहरातील दारव्हा रोडवरील लाठीवाला पेट्रोल पंपजवळ दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी सुरेश मेटकर हे त्यांची दुचाकी वाहनाने जात असताना त्यांना भरधाव चारचाकी वाहन चालकाने ठोस मारली होती. त्यामुळे अपघात होऊन सदर अपघातामध्ये सुरेश मेटकर हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटने प्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी मृताकाचा मुलगा अनिरुद्ध मेटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.