महाड: श्रीवर्धन कापोली येथे रस्त्याच्या विकासकार्याचे तसेच स्मशानभूमीच्या बांधकामाचे उद्घाटन
Mahad, Raigad | Sep 16, 2025 आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास कापोली, श्रीवर्धन येथे श्रीवर्धनकर यांच्या घरापासून ते मौजे कापोली स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या विकासकार्याचे तसेच स्मशानभूमीच्या बांधकामाचे उद्घाटन समारंभ खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते पार पडले. सदर रस्ता हा गावकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आणि दैनंदिन वापरातील महत्त्वाचा मार्ग असून, त्याच्या सुलभ व सुरक्षित दळणवळणासाठी हे काम गरजेचे होते. यामुळे नागरिकांना अंतिम संस्काराच्या वेळेस होणारा त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होईल.