शिरूर: निमगाव म्हाळुंगी येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
Shirur, Pune | Sep 17, 2025 निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कामिनी ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोध पथकाला सापडला. सूरज अशोक राजगुरू (वय ३०, सध्या राहणार निमगाव म्हाळुंगी) या पुरातील पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शोध पथकाला सापडला.