आमगाव: कातुर्ली येथील मंदिर फोडून चोरी,तालुक्यातील कातुर्ली येथील घटना
Amgaon, Gondia | Sep 19, 2025 आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील दुर्गा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे ५ हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली. मंदिरातील हॉलमधील लोखंडी दानपेटी व आतील लाकडी दानपेटीचे कुलूप तोडून ५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. कांतीलाल हेमरा