पवनी: पवनीत शेतातील जाळ्यात अडकले घुबड ! वनविभागाने दिले जिवनदान
Pauni, Bhandara | Oct 23, 2025 आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी पवनी येथील शेतकरी विशाल थोटे यांच्या शेतातील कुंपण असलेल्या जाळ्यात एक कन्हेरी शिंगडा घुबड अडकले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आली. वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.आर.टी. सदस्य अतुल जुमडे व जागेश्वर कांबळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या घुबडाची काळजीपूर्वक सुटका केली. नंतर त्या घुबडाला निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आले.