दिग्रस: दिग्रस नगर परिषद निवडणूकीत बाद झालेले ३ अर्ज न्यायालयात पात्र, निवडणुकीत रंगणार चुरस
दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विक्रम अटल व रवींद्र अरगडे तसेच प्रभाग क्र. ५ च्या भाजपचे उमेदवार लक्ष्मीबाई मेहता यांचे उमेदवारी अर्ज त्रुटींचा दाखला देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केले होते. या निर्णयाविरोधात तिन्ही उमेदवारांनी दारव्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. आज सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सत्र न्यायालयाने तिघांचे अर्जांना मंजुरी देण्याचे आदेश दिले.