घनसावंगी: तीर्थपुरीतील मटकाबुकी रॉयल डिके गजाआड
ऑनलाइन मटका बुकिंग करणाऱ्या आरबी टेलर ऊर्फ रमेश भरत राऊत ऊर्फ रॉयल डिके याच्या मागावर असलेल्या पोलिसांना अखेर यश मिळाले. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मुरमा येथे तो आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तीर्थपुरी पोलिस ठाण्यात आणून डांबण्यात आले.