तळा: तळा:महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे रायगड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येणार.
आमदार भरत गोगावले.
Tala, Raigad | Apr 21, 2024 महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे हेच रायगड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येणार असल्याचे प्रतिपादन महाड, पोलादपूर व माणगाव चे आमदार भरत गोगावले यांनी शनिवार दि.२० एप्रिल रोजी रात्री सात वाजताच्या दरम्यान तळा शहरातील मेकडे सभागृह येथे केले.याप्रसंगी शिवसेना शिंदेगट तालुका प्रमुख प्रदूम ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके यांसह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.