शिरपूर: मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारात दुचाकींचा भीषण अपघात - 2 युवक गंभीर जखमी
Shirpur, Dhule | Sep 22, 2025 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास तालुक्यातील पळासनेर शिवारात हॉटेल साईप्रसाद जवळ दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला.सदरअपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.राहुल प्रकाश पावरा वय २२,रितेश तुकाराम पावरा वय २० दोघे रा. आसरापाणी ता.शिरपूर असे जखमी युवकाचे नावे आहेत.