धर्माबाद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आजरोजी मतदान प्रक्रिया सुरू असून त्यातच शहरातील बनाळी रोडवरील इनानी कन्वेक्शन हॉल येथे भाजपच्या वतीने शहरातील मतदारांना पैशाचे आमिष दाखवून डांबून ठेवले असल्याचा आरोप पुढे येत असून या ठिकाणचे अनेक असे व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सदर घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासनाने जाऊन हॉलचे शट्टर उचलले असता अनेक मतदार मात्र पळत असल्याचे दिसत आहेत. या अनुषंगाने कुणी तक्रार दिल्यास आपण नक्की कार्यवाही करू असे प्रशासनाच्या वतीने म्हटले गेले