एरंडोल: पद्मालय येथील भीमकुंडा जवळ लावलेल्या कारमधून १८ हजाराचे साहित्य चोरी, एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
एरंडोल तालुक्यात पद्मालय आहे.या पद्मालय येथे भीम कुंड आहे. या भीमकुंडा जवळ धीरज दिवाण यांनी त्यांची कार क्रमांक एम. एच.१५ एच.वाय.८७२३ ही लावली होती. तेव्हा तेथे लावलेल्या त्यांच्या कारचा दरवाजा उघडून तिथून मोबाईल लॅपटॉप असा एकूण १८ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केला. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे