नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणी तालुक्यातील नांदापूर शिवारात दोन नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दोन नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.