सावनेर: बालाजी लॉन सावनेर येथे लोकरंग गरबा महोत्सव चे आयोजन
Savner, Nagpur | Sep 30, 2025 'लोकरंग कलाश्रृंगार गृह, सावनेर' यांच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'लोकरंग गरबा महोत्सव २०२५' चे ८ वे पर्व दि. 30 सप्टेंबर २०२५ रोजी बालाजी लॉन, सावनेर येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. या सांस्कृतिक महोत्सवात समूह गरबा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले, ज्याला स्थानिक नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.