माण: देवदर्शनावरून परतताना दुचाकीला बेलोरो गाडीची भीषण धडक,शेनवडी फाटा येथील घटनेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
Man, Satara | Oct 6, 2025 कराड–पंढरपूर महामार्गावर माण तालुक्यातील शेनवडी फाटा येथे रविवारी रात्री दुचाकीला बेलोरो गाडीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता झाली आहे,या धडकेत शहाजी तातू शिंदे (वय 65, रा. शेंडगेवाडी, बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली यांचा जागीच मृत्यू झाला असून दादा तुळशीराम व्हटकर, हे गंभीर जखमी झाले आहेत.