उदगीर: बोगस गुंठेवारी देणाऱ्यावर गुन्हे दाखल करा,बहुजन विकास अभियानाचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाटणे सत्याग्रह
Udgir, Latur | Oct 31, 2025 उदगीर नगरपालिकेला अंधारात ठेवून १९ बोगस गुंठेवारीचे प्रमाणपत्र देणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे दाखल करा, बोगस गुंठेवारीचे फार मोठे रॅकेट आहे याची वेगळी समिती नेमून चौकशी होईपर्यंत गुंठेवारी कोणती आणि बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र कोणते याची शहानिशा करा आमची मागणी खोटी असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१ ऑक्टोबर रोजी बहुजन विकास अभियानाच्या वतीने लाटणे सत्याग्रह करण्यात आले, व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले