साकोली: जांभळी सडक येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फेभंडारा जिल्हास्तरीय प्रचारक कार्यकर्ता मेळावा
जांभळी सडक येथील मार्तंड राव पाटील कापगते विद्यालयात रविवार दि14 सप्टेंबरला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या तर्फे भंडारा जिल्हास्तरीय प्रचारक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सकाळी11ते सायंकाळी 5वेळात करण्यात आले. सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे,उपसर्वाधिकारी दामोदर पाटील,स्वागताध्यक्ष होमराजभाऊ कापगते,प्रकाश महाराज वाघ अशोक चरडे प्रा.राम राऊत,विठ्ठलराव सावरकर बाबाराव पाटील,देवरावजी भांडारकर,नीलकंठ कळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती