बजाजनगर परिसरातील कोलगेट चौकात किरकोळ वादातून चाकू हल्ला यामध्ये एक युवक गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज दि 16 सप्टेंबर सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज औद्योगिकनगरीतील बजाजनगरच्या कोलगेट चौकात, दिवसाढवळ्या किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले, नेमका वाद कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कोलगेट चौक हे मोठ्या वरदळीचे ठिकाण आहे. अशातच दिवसाढवळ्या अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.