धुळे: जिजाऊ ब्रिगेडतर्फे देवपूर भागात 'शिव विचार बैठक' संपन्न, प्रदूषणमुक्त दिवाळीचा दिला संदेश
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळेतील देवपूर परिसरात जिजाऊ ब्रिगेडतर्फे ‘शिव विचार बैठक’ उत्साहात पार पडली. “प्रत्येक आईमध्ये जिजाऊ दडलेली आहे” या संदेशाने बैठकीची सुरुवात झाली. विभागीय अध्यक्षा नुतन पाटील यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहन करत “मुली-सुनांचा सन्मान हीच खरी संस्कृती” असा संदेश दिला. डॉ. सुलभा कुवर यांनी शिवराज्याच्या लोककल्याणकारी विचारांची मांडणी केली. अखेरीस महिलांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणा देत एकात्मतेचा संकल्प केला.