स्थानिक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आणि जनसामान्यांच्या 'विश्वासाची ताई' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) यांनी प्रभाग क्रमांक १० मधील मंगळवारी वार्डात विशेष भेट देऊन परिसरातील नागरी समस्यांची सविस्तर पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वार्डातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. आपल्या हक्काच्या नगराध्यक्षांना प्रत्यक्ष भेटीला आलेले पाहून नागरिकांनी विविध प्रलं