धुळे: दिवाळीपूर्वी गुन्हेगारांना पोलिसांचा दणका! चाळीसगाव रोड परिसरात 'ऑपरेशन ऑल आऊट', ५१ जणांची झाडाझडती
Dhule, Dhule | Oct 18, 2025 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी पहाटेपासून ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले. कुख्यात गुन्हेगार, फरार आरोपी आणि नुकतेच सुटलेले आरोपी यांच्या घरांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली. आतापर्यंत ५१ संशयितांची चौकशी झाली असून, बेकायदेशीर वस्तू आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. सण संपेपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे.