श्रीगोंदा: श्रीगोंद्यात तालुक्यात अतिवृष्टीचा कहर ; श्रीगोंदा शहर परिसराला पाण्याने झोडपले ;
श्रीगोंद्यात तालुक्यात अतिवृष्टीचा कहर ; श्रीगोंदा शहर परिसराला पाण्याने झोडपले ; अनेकांचे संसार उघड्यावर तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ; अनेकांना अश्रू अनावर अहिल्यानगर – जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने श्रीगोंदा तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. करंजी परिसरात कधी नव्हे असा अविरत पाऊस झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.