अमली पदार्थ विरोधी पथक आणि बुटीबोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५२.३० ग्रॅम मेफेड्रोन पावडरसह एका आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थाची किंमत सुमारे २ लाख ६१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.बोरखेडी फाटक जवळील एका मोकळ्या जागेत अमली पदार्थांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता, तेथे एक संशयास्पद कार दिसली.