उमरखेड: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतल्यालागत पेट्रोप पंपाचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात
मागील तीन ते चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्यालागत असलेले अतिक्रमित पेट्रोल पंप हटविण्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले, आंदोलन कर्त्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले मात्र या अखेर प्रशासनाला जाग येउन सदर अतिक्रमण हटविण्यास सुरूवात झाली आहे.