यवतमाळ: जिल्ह्यात सर्वत्र गोवर्धन पूजा उत्साहात साजरी
आज दिनांक 22 ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र गोवर्धन पूजा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोपालकांनी आपल्या गोधनाला स्नान घालून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सजविले. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून नैवेद्य अर्पण केला.यानंतर गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तरुण मित्रमंडळीचा उत्साह पाहायला मिळाला.तरुणांसह चिमुकल्यांनी सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी केली. एकंदरीत जिल्ह्यामध्ये सर्वत्र अतिशय उत्साहात गोवर्धन पूजा पार पडली.