श्रीवर्धन: वेळास समुद्रात दोन सख्या भावासह एक नातेवाईक यांचा बुडून मृत्यू
रायगडमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनच्या वेळास समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली. पोहण्यासाठी तिन्ही तरुण समुद्रात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. स्थानिक नागरिकांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले पण तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.मयुरेश पाटील (23), हिमांशू पाटील (21) व अवधूत पाटील (26) अश् मृत तरुणांची नावे आहेत