दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे आमदार गजानन लवटे यांनी आज दुपारी १ वाजता राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांची भेट घेतली, अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठा गटाचे आमदार गजानन लवटे हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वृत्तवाहिन्यांवर झळकत असून, आज खासदार अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र याबाबत आमदार लवटे किंवा संबंधित पक्षाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.