श्रीगोंदा: अहिल्यानगर फ्लॅश : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला
अहिल्यानगर फ्लॅश : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला अहिल्यानगर : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर तापलेले आंदोलन आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आज दुपारी अज्ञात तरुणांनी काठ्यांनी हल्ला केला. हा प्रकार अहिल्यानगर शहरालगत असलेल्या अरणगाव बाह्यवळण रस्त्यावर घडला असून या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.