घनसावंगी: चित्रवडगांव येथे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण
घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे विविध विकास कामाचे लोकार्पण माजी मंत्री आ. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यात चित्रवडगांव फाटा ते गाव रोडचे भूमिपूजन व 2022- 23 मध्ये गावांतर्गत माजी सरपंच वर्षा सोसे यांनी केलेल्या विविध कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी सभापती गंगाधर सोसे,आबासाहेब वरखडे, बळवंत देशमुख,मधुकर देशमुख,अमोल देशमुख,धनंजय देशमुख,नजीम पठाण, डॉ सय्यदयादी उपस्थित होते.