आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तहसील कार्यालय परीसरात सामाजिक कार्यकर्ते नारायण साबळे यांचे मागील पाच दिवसापासून भोकरदन शहर व भोकरदन पोलीस ठाणे अगदी तसेच तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे, मात्र त्यांच्या या आमरण उपोषणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आज परिसरातील महिलांनी व पुरुषांनी मोठ्या संख्येने त्यांच्या या आमरण उपोषणासाठी उपस्थिती लाभ त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.